उपक्रम

एक गाव, बारा उपक्रम

  • 1

    पायाभूत सुविधा : वीज, रस्ते, पाणी ग्रामीण भागात निर्मिती होणाऱ्या उत्पादनांचा योग्य विक्रीविनियोग होण्यासाठी गावातील दळणवळणांची साधने अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. अखंडित वीज आणि पाणी या प्रमुख सुविधा गावात योग्य प्रकारे चालू असल्यास गावाचा विकासाला चालना मिळते. रस्ते बांधणी प्रकल्प, अखंडित वीज पुरवठा, पाणी आडवा-पाणी जिरवा सारखे प्रकल्प सरकारच्या माध्यमातून गावखेड्यात राबविण्यासाठी मार्गदर्शन प्रयत्न करणे. (300)

  • 2

    आरोग्य : शरीर निरोगी तर कुटुंब, गाव निरोगी. ग्रामीण भागातील बालक ते ज्येष्ठांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, महिलांसाठी विशेष तपासण्या आणि तरुणांसाठी, प्रौढांसाठी रक्तदान, आरोग्यविमा शिबिर सारखे उपक्रम विविध वैद्यकीय तज्ज्ञांच्या माध्यमातून राबविणे. (100)

गावाची स्थिती गुण श्रेणी
खूप वाईट 0-200
वाईट 201-400
सर्वसाधारण 401-600 क+
बरी 601-800
चांगली 801-1000 ब+
उत्तम 1001-1100
अतिउत्तम 1101-1200 अ+
  • 3

    शिक्षण : ग्रामीण भागात शिक्षणाच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्याने शिक्षणासाठी मोठया प्रमाणावर शहरांकडे स्थलांतर होते आहे. यामुळे शहरे बकाल व खेडी ओस पडत चालली आहेत. हे रोखायचे असेल तर ग्रामीण भागातील शाळांना उत्तम शैक्षणिक सुविधा पुरवणे हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. संस्थेच्या माध्यमातून ’जगा आणि जागा - समृद्धीतून सहयोग’ या उपक्रमातर्गत समाजाच्या सहयोगाने या सुविधा उपलब्ध करून देणे. (100)

  • 4

    शेती, पर्यावरण आणि शेतीपूरक व्यवसाय : शेती, ’लोत्पादन, ’ुलोत्पादन यासार‘या शेती प्रकारांबरोबरच शेतीपूरक व्यवसायांना सक्ष’ करण्याच्या दृष्टीने ग्रामस्थांसाठी शेती तज्ज्ञांच्या ’ार्’त शेतकर्यांशी संवाद साधून पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, कुक्कुटपालन, शेळीपालन, वराहपालन व मत्स्यव्यवसाय सारखे विविध उपक्रम, त्यांच्या उत्पादन व विपणनासाठी कार्यक‘म राबविण्यासाठी मार्गदर्शन करणे.(120)

  • 5

    रोजगार, कौशल्य प्रशिक्षण व ग्रामीण तंत्रज्ञान : होतकरू, उत्साही आणि गरजू तरुणांना नोकरी किंवा उद्योग क्षेत्रात आवश्यक ती कौशल्य असत, आत्’सात करण्याची नितांत गरज आहे. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत विविध क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण व करिअरबाबत संवाद साधणे तसेच शेतीपूरक व्यवसायात येणारे लघु उद्योगाबाबत युवकांना प्रोत्साहित करणे. (80)

  • 6

    सहकार व शेती कंपन्या : गावातील समृद्धीसाठी सहकाराची मोठी साथ लाभत असते. सहकारी तत्त्वावर विविध कार्यकारी संस्था तसेच हल्लीच्या शेती कंपन्यांच्या माध्यमातून गावखेड्यातील समृद्धीला चालना मिळवून देणे. (50)

  • 7

    ग्रामस्वच्छता व पर्यावरण : स्वच्छ सुंदर, हरितग्राम निर्मितीसाठी स्वच्छता अभियान मोहीम पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येईल. यात हागणदारीमुक्त खेडे, संडास बांधणी प्रकल्प, वृक्षारोपण, सांडपाणी प्रकल्पसार‘या उपक्रमाच्या माध्यमातून स्वच्छ ग्राम स्वच्छ भारत ही संकल्पना बळकट करणे.(80)

  • 8

    महिला सक्षमीकरण व बालकल्याण : ग्रामीण भागातील महिलांना स्वायत्तता, सुरक्षा आणि संरक्षण देण्यासाठी महिला सक्षमीकरणासारखे उपक्रम राबविणे गरजेचे आहे. बचतगट, प्रशिक्षण, स्त्री प्रश्न जनजागृती, कुटुंब संगोपन, शारीरिक-मानसिक आरोग्य सारख्या उपक्रमातून महिलासक्षमी करणावर भर देणे. (80)

  • 9

    ज्येष्ठ नागरिक, कौटुंबिक आणि सामाजिक समस्या निराकरण : समाज म्हटलं की सामाजिक, कौटुंबिक ताणतणावही आलेच. व्यसनमुक्ती, जात पंचायत, हुंडाबंदी, अंधश्रद्धा, दारू व गुटखा निर्मूलनासारखे उपक्रम हाती घेऊन कौटुंबिक कलह, सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन करणे.(120)

  • 10

    जनजागरण : प्रशिक्षण/संवाद/शिबीर/प्रबोधन : महिला, युवक, युवती, विद्यार्थी,पालक, शेतकरी, ग ्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या सर्वांगीण विकासाच्यासाच्या दृष्टीने विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, शेती, कायदेविषयक, अर्थविषयक, शासकीय योजना, सुविधा, उद्योग आणि रोजगार यासारख्या विषयांवर प्रशिक्षण, शिबिरे, संवाद आणि प्रबोधनरूपी कार्यक्रम आयोजित करणे.(80)

  • 11

    संस्कृतीसंवर्धन : कला/कि‘डा/साहित्य/संस्कृती/मनोरंजन/पर्यटन : प्रत्येक गावांची एक संस्कृती असते. या संस्कृतीत अनेक वैविध्यपूर्ण कलांचा उगम गाव भागातच होत असतो. त्याच प्रमाणे या कला काही वेळेस ग्राम ’विकासाच्या किंवा मनोरंजनाच्या दृष्टीने अनेक प्रथांशीही जोडलेल्या असतात. ग्रामीण अर्थ विकासाला, लोककलेला बळकटी देणाऱ्या विविध कलांना आणि मनोरंजनाच्या निमित्याने ग्रामस्थांना संघटित करणाऱ्या गावातील मनोरंजनात्’क उपक्रमाना क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे. तसेच बालक, महिला, तरुण आणि समस्त ग्रामस्थांना साहित्याची गोडी लागावी आणि त्यांच्यावर वाचन संस्कार व्हावेत यासाठी साहित्याशी निगडित उपक्रम, ग्रंथालय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही मार्गदर्शन करणे. (60)

  • 12

    नैसर्गिक आपत्ती निवारण : भूकंप, दुष्काळ, वणवा, पूर, वादळ सार‘या नैसर्गिक आपत्ती अचानकपणे जेव्हा ग्रामस्थांवर ओढवली जाते तेव्हा त्यांना मानसिक उभारी देणे नितांत आवश्यकता असते. अशा नैसर्गिक आपत्तीगस्त ग्रामस्थांचे मनोधर्य उंचावून, सहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणे. (30)

आपल्या गावाचे मुल्यांकन ‘सादग्राम’ ऍपद्वारे आपण करू शकाल. ग्रामपंचायत आणि गावकरी मिळून एकत्रितपणे सर्वांगीण ग्रामविकासाच्या दृष्टीने ठराव समत करून. अनिवासी गावकरी यांचे ग्रामविकासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष मोलाचा सहभाग मिळवून

Concept By : Harish Butle

Links