About Us

गाभ्यातील विचार

असं म्हणतात की, आपला भारत खेड्यांत राहतो. खेड्यात वाढतो, फुलतो; पण गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलू पाहतंय. वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात खेडी आपलं स्वत्व, आपली अस्मिता गमावत आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होतो. शहरांमध्ये उपलब्ध असणार्याे ‘रोजगाराच्या संधी, शिक्षणाच्या सोयी-सुविधा, पाश्चात्त्य विचारांची व आधुनिकीकरणाची भुरळ या व अशा अनेक कारणांमुळे खेड्यांतून शहरांकडे होणारे विस्थापन आणि ओस पडणारी खेडी ही एक चिंतेची बाब बनली आहे.

या समस्येवर मात करायची असेल तर खेड्यात राहणारा भारत समजून घ्यायला हवा. खेडी समजून घ्यायला हवीत आणि भारताचा विकास साधायचा असेल तर खेडी विकसित व्हायला हवीत. शिक्षण हा कोणत्याही विकासाचा पाया बनला गेला आहे. विकासाच्या सर्व संकल्पना या प्रभावी शिक्षणाभोवती गुंफल्या गेल्या आहेत म्हणूनच खेड्यांचा विकास साधायचा असेल तर खेड्यात उपलब्ध शैक्षणिक सोयी-सुविधा सक्षम करणे गरजेचे आहे. ग्रामीण शैक्षणिक विकासाचे हेच ध्येय व उद्दिष्ट समोर ठेवून साद माणुसकीची फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेची ध्येय व उद्दिष्टे खालीलप्रमाणे...

ध्येय

समृद्धजनांच्या सहभागातून स्वयंप्रेरित व सातत्यपूर्ण ग्रामीण शैक्षणिक विकास

उद्दिष्टे

  1. लोकसहभागातून ग्रामीण भागातील शाळां’ध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
  2. लोकसहभागासोबत शिक्षक, उद्योजक व सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शाळा सक्षमीकरणासाठी दिशादर्शन करणे
  3. ग्रामीण शाळांतील शिक्षकांचे सक्षमीकरण करणे.
  4. समाजाचे प्रयत्न व त्याचा सकारात्मक परिणाम यांची योग्य माहिती सर्व हितधारकांपर्यंत पोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पारदर्शी माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे.
  5. ग्रामीण शैक्षणिक विकासाच्या संकल्पनेला समापित सेवाभावी कार्यकर्त्यांची फळी उभी करून त्यांचे प्रशिक्षण व क्रियान्वयन करणे
  6. दानशूर व्यक्ती/संस्था/उद्योग व गरजू ग्रामीण शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्था यांच्यामधील एक विश्वासार्ह पूल म्हणून स्वतःला स्थापित करणे.

Concept By : Harish Butle

Links