'जगा आणि जागा' प्रकल्पाचा शुभारंभ मागील वर्षी झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब‘ारपूर तालुक्यातील कोठारी व आसपासची 9 गावे यासाठी निवडण्यात आली. कोठारी हे मा. श्री. हरीश बुटले (संस्थापक - साद माणुसकीची फाउंडेशन) यांचे मूळ गाव. त्यामुळे ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीनुसार बुटले सरांनी स्वतःच्याच गावापासून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी केली. सर्व शाळांचा प्रत्यक्ष सर्व्हे करण्यात आला. मुख्याध्यापक, शिक्षक, गामपंचायतीचे पदधिकारी या सर्वांशी चर्चा करून शाळेची आजची नक्की गरज काय आहे, याची एक विस्तृत यादी बनवण्यात आली. बुटले सरांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःचे 5 लाख रुपये (दर वर्षी 1 लाख) याप्रमाणे देण्याचे जाहीर करून विद्यालंकार ज्ञानपीठ ट्रस्टच्या माध्यमातून 20 लाख रुपये मिळवून दिले. या सुविधांची देखभाल व व्यवस्थापन करण्याची जबाबदारी स्थानिक शिक्षकांनीच उचलली व त्यासाठी प्रत्येकी 5 हजारांची वर्गणी गोळा करण्याची तयारी दर्शवत काहींनी प्रत्यक्ष तशी सुरुवातही केली. निर्देशित सुविधा 20 दिवसांच्या अल्प कालावधीत पूर्ण करण्यात आल्या. या सुविधांचे वितरण व लोकार्पण सोहळा 30 ’मार्च 2017 रोजी कोठारी येथे संपन्न झाला.