शहरात जाऊन स्थैर्य प्राप्त झालेल्या व्यक्तींनी वळून आपल्या गावाकडे पाहिले, गावातील समस्या समजून घेतल्या, त्या सोडवण्यासाठी सक्रिय प्रयत्न केले तर त्या-त्या गावांचा विकास वेगाने होईल, हाच विचार हा ‘जगा आणि जागा : समृद्धीतून सहयोग’ या प्रकल्पाचा गाभा आहे. आपल्या गावात शालेय शिक्षण घेऊन नंतर शहरात जाऊन समृद्ध झालेल्या ‘अनिवासी गाववासीनी ज्या पद्धतीने आपल्या गावाकडे वळून बघायला हवे होते ते न बघितल्यामुळे आज गावांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. ‘अनिवासी गाववासीचा आपल्या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, आपणही आपल्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे, हा विचार त्यांच्याही मनात यावा व त्यांच्या सहभागातून किमान त्यांच्या गावांचा योग्य विकास व्हावा, हा या प्रकल्पाचा हेतू आहे. या प्रकल्पाअंतर्गत ‘अनिवासी गाववासीना सहभागाच्या विविध संधीतून, जशा की वेळ, पैसा, श्रम, कौशल्य, बुद्धिमत्ता इतदी उपलब्ध करून देऊ शकतील. सरकारी मदतीवर केवळ अवलंबून न राहता गावातून बाहेर पडलेल्या समुद्ध लोकांनी आपआपल्या गावासाठी.......पुढाकार घेत योगदान देणे ही काळाची गरज आहे. या प्रकल्पाविषयीचे एक बोलके उदाहरण आपणा सर्वांसमोर विशद करावेसे वाटते. या प्रकल्पाचा शुभारंभ मागील वर्षी झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब‘ारपूर तालुक्यातील कोठारी व आसपासची 9 गावे यासाठी निवडण्यात आली. कोठारी हे ’मा. श्री. हरीश बुटले (संस्थापक - साद माणुसकीची फाउंडेशन) यांचे मुळ गाव. त्यामुळे ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीनुसार बुटले सरांनी स्वतःच्याच गावापासून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी केली. सर्व शाळांचा प्रत्यक्ष सर्व्हे करण्यात आला. मुख्याध्यापक, शिक्षक, गमपंचायतीचे पदधिकारी या सर्वांशी चर्चा करून शाळेची आजची नक्की गरज काय आहे, याची एक विस्तृत यादी बनवण्यात आली. बुटलेसरांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःचे 5 लाख रुपये (दर वर्षी 1 लाख) याप्रमाणे देण्याचे जाहीर करून विद्यालंकार ज्ञानपीठ ट्रस्टच्या माध्यम्यातून 20 लाख रुपये मिळवून दिले. या सुविधांची देखभाल व व्यवस्थापन करण्याची जबाबदारी स्थानिक शिक्षकांनीच उचलली व त्यासाठी प्रत्येकी 5 हजारांची वर्गणी गोळा करण्याची तयारी दर्शवत काहींनी प्रत्यक्ष तशी सुरुवातही केली. निर्देशित सुविधा 20 दिवसांच्या अल्प कालावधीत पूर्ण करण्यात आल्या. या सुविधांचे वितरण व लोकार्पण सोहळा 30 मार्च 2017 रोजी कोठारी येथे संपन्न झाला.