ध्येय :
समृद्धजनांच्या सहभागातून स्वयंप्रेरित व सातत्यपूर्ण ग्रामीण शैक्षणिक विकास
उद्दिष्टे :
- लोकसहभागातून ग्रामीण भागातील शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- लोकसहभागासोबत शिक्षक, उद्योजक व सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शाळा सक्षमीकरणासाठी दिशादर्शन करणे
- ग्रामीण शाळांतील शिक्षकांचे सक्षमीकरण करणे.
- समाजाचे प्रयत्न व त्याचा सकारात्मक परिणाम यांची योग्य माहिती सर्व हितधारकांपर्यंत पोचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पारदर्शी माहिती व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे.
- ग्रामीण शैक्षणिक विकासाच्या संकल्पनेला समर्पित सेवाभावी कार्यकर्त्यांची फळी उभी करून त्यांचे प्रशिक्षण व क्रियान्वयन करणे
- दानशूर व्यक्ती/संस्था/उद्योग व गरजू ग्रामीण शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्था यांच्यामधील एक विश्वासार्ह पूल म्हणून स्वतःला स्थापित करणे.