प्रकल्प

ग्रामविकासाची पंचसूत्री

  • शिक्षण : शिक्षण हा कोणत्याही विकासाचा पाया मानला गेला आहे. म्हणूनच खेड्यांचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण शैक्षणिक विकास साध्य करणे अत्यंत गरजेचे आहे.

  • आरोग्य : बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांत निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या समजून घेऊन त्या समस्यांवर मुलभूत व सहज परवडणाऱ्या उपाययोजना ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे हे अत्यंत गरजेचे आहे.

  • शेती, पर्यावरण : भारतातील बहुतांश ग्रामीण समाज शेती व शेतीपूरक उद्योगांवर अवलंबून आहे. हा समाज आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर व संपन्न होईल यासाठी संघटित प्रयत्न करणे.

  • रोजगार, कौशल्य : ग्रामीण भागातील युवकामध्ये लपलेल्या विविध कौशल्यांना वैशिष्ट्यपूर्ण आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विकसित करण्यासाठी विविध संस्थांच्या सहयोगाने कौशल्यविकास कार्यक्रम राबवणे व या युवकांना स्वाभिमानाने उपजिविकेची खात्री देणारे प्रयत्न करणे

  • वृद्धसेवा : बदलती परिवार पद्धती व समाजरचना यातून वयोवृद्ध व्यक्तींच्या वेगळ्याच समस्या आज निर्माण होत आहेत. भविष्यात त्या अजून जटिल स्वरूप धारण करतील. या समस्यांवर वेळीच अभिनव उपाययोजना तयार करून ज्येष्ठ व वृद्ध व्यक्तींना समाजात उन्नत व सन्मानाचे स्थान निर्माण करून देणे

आपल्या गावाचे मुल्यांकन ‘सादग्राम ऍपद्वारे (2 ऑक्टोबर 2018 पासून) आपण करू शकाल.ग्रामपंचायत आणि गावकरी मिळून एकत्रितपणे सर्वांगीण ग्रामविकासाच्या दृष्टीने ठराव संमत करून. अनिवासी गावकरी यांचे ग्राम विकासाच्या अनुषंगाने मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष मोलाचा सहभाग मिळवून

Concept By : Harish Butle

Links